Monday, October 5, 2026
Homeगडचिरोलीजिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल सोमवारच्या रात्री प्रत्यक्ष पाहणी केली. एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या कामांना गती देऊन ती येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश हे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते.जिल्हाधिकारी  पंडा यांनी मार्कंडा परिसरातील कामांची सध्याची स्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीची माहिती घेतली.
एमएसआरडीसीच्या अखत्यारित सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित कामांचे योग्य नियोजन करून त्यांना आवश्यक गती द्यावी आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे,अशा सूचना दिल्या.विशेषतः एमएसआरडीसीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास न्यावीत,असे निर्देश त्यांनी दिले.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत मार्कंडा परिसरात सुरू असलेल्या कामांचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.संबंधित अधिकाऱ्यांकडून या कामांच्या सद्यस्थितीची व प्रगतीची माहिती त्यांनी घेतली.दरम्यान, परिसरातील अतिक्रमणाच्या अनुषंगाने संबंधित नागरिकांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा तसेच त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी,अशा सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मार्कंडा परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाबाबतही जिल्हाधिकारी पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक  रमेश यांनी चर्चा केली.परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना दिल्या.मार्कंडा परिसरातील विविध कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक कार्यवाही करावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!