Thursday, August 6, 2026
Homeगडचिरोलीकोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी पुलाच्या तांत्रिक स्थितीबाबत खुलासा केला आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर पूल हा सॉलिड स्लॅब राफ्ट फाउंडेशन सबमर्सिबल ब्रिज प्रकारातील असून त्याची लांबी १०५ मीटर(१५ स्पॅन ×७ मीटर) व रुंदी ७.५० मीटर आहे.नदीपात्रापासून पुलाची उंची सुमारे ६.५ मीटर असून सन २०२२ मध्ये सुमारे ४.१० कोटी रुपये खर्चून त्याची उभारणी करण्यात आली होती.
दिनांक-२९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत एटापल्ली परिसरात २०० ते २१० मिमी इतका अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आला. या काळात पुलावरून सुमारे २ ते २.५ मीटर उंचीपर्यंत पाणी वाहत होते.घटनास्थळी करण्यात आलेल्या तांत्रिक पाहणीत १५ स्पॅनपैकी ५ स्पॅन सुरक्षित,१ स्पॅन नदीपात्रात खचलेला,२ स्पॅन नुकसानग्रस्त,३ स्पॅनमध्ये संरचनात्मक हालचाल,तर उर्वरित ४ स्पॅन सुरक्षित असल्याचे आढळून आले.
प्राथमिक तांत्रिक निरीक्षणानुसार,नदीकाठाची धूप तसेच पाया परिसरातील बदलांमुळे राफ्ट फाउंडेशनजवळ पोकळी निर्माण होऊन पुलाच्या संरचनेचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.या बाबींची सविस्तर तांत्रिक तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.
सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालानुसार पुलाची दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार पुनर्बांधणीची कार्यवाही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, घटनेची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून पुलाच्या नुकसानीस कारणीभूत बाबींचा सर्वंकष तपास केला जाईल.चौकशी अहवालानुसार जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!