Tuesday, August 4, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून आधार नोंदणी संच वितरणासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय,महाराष्ट्र शासनामार्फत गडचिरोली जिल्हा प्रशासनाला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त झाले आहेत. या संचांचे वितरण जिल्ह्यातील २५ रिक्त महसूल मंडळ क्षेत्रे,४ मिनी सेतू केंद्रे आणि अतिरिक्त गरज असलेल्या १९ महसूल मंडळांमध्ये करण्यात येणार आहे.
आधार नोंदणी सेवा केंद्रासाठीची जाहिरात,केंद्रांची यादी तसेच अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर www.gadchiroli.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

तलावात बुडालेल्या तरुणाचा आज सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या धानोरी गावातील २२ वर्षीय तरुण काल रविवारच्या सायंकाळी गाव तलाव परिसरात आंघोळ करण्यासाठी उतरला असता क्षणात दिसेनासा झाल्याने परिसरात एकच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!