Wednesday, July 29, 2026
Homeगोंदियापुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ काल सोमवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली.कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाचे कठडे तोडून थेट कालव्यात(मोठा नहर)कोसळली.यात लीलाबाई रेखलाल गौतम वय ६५ वर्षे,रा.साखरीटोला, ता.सालेकसा, जि.गोंदिया यांचा जागीच मृत्यू झाला,तर मुलगा विजय रेखलाल गौतम वय ४८ वर्षे,सून सरिता विजय गौतम वय ४० वर्षे,रा.साखरीटोला, ता.सालेकसा,जि.गोंदिया व कार चालक यश लक्षणे वय २५ वर्षे,रा.आमगाव,ता.आमगाव, जि.गोंदिया अशी गंभीर जखमी तिघांची नावे आहेत. जखमींना कालव्यातून बाहेर काढून गोंदियाच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिघांवर उपचार सुरू आहेत.
विजय गौतम यांचा मुलगा नागपूर येथील सैनिकी शाळेत शिकत असल्याने लीलाबाई यांना नातवाची भेट घ्यायची होती.त्यासाठी,मुलगा विजय व सुन सरिता आणि लीलाबाई हे सर्वजण एमएच ३५ एजे ३७७७ क्रमांकाच्या कारने नागपूर येथे विजयच्या मुलाला भेटायला गेले होते.सोमवारच्या रात्री नागपूरवरून गावाकडे परत निघाले असता हरदोली गावाजवळ शेत शिवारात असलेल्या पुलाजवळ कारने येताच मध्यरात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान कार चालक यश लक्षणे याला झोपेची डुलकी आली.डुलकी येताच त्याचा कारवरील ताबा सुटला.दरम्यान,कार अनियंत्रित होऊन पुलाचे कठडे तोडत थेट कालव्यात पडली.घडलेल्या अपघातात लीलाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर विजय,सरिता व चालक यश हे तिघेही गंभीर जखमी झाले.कालव्यात पाणी कमी असल्याने तिघांचा कसाबसा जीव वाचला.याचवेळेस विजयने आपल्या वडिलांना फोन करून घटनेबाबत कळवले.त्यानंतर,रुग्णवाहिका बोलावून जखमींना कालव्यातून बाहेर काढून गोंदियाच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नातवाला भेटून आलेल्या आजीने अपघातात जीव गमावल्याने गौतम कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!