Tuesday, September 8, 2026
Homeमुंबईलाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार...

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.तर छाननीनंतर राज्यातील तब्बल ८० लाख ७१ हजार ९५२ महिला अपात्र ठरल्याने अश्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे.विशेष म्हणजे,सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ४७ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यानुसार,कागदपत्रांची व अर्जांची छाननी केल्यानंतर अनेकजण योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरले. अश्यातच २४ लाख महिलांनी अर्जात चुकीने स्वतःची नोंद ‘शासकीय कर्मचारी’ केली होती; त्यामुळे सुरुवातीला त्या अपात्र ठरल्या होत्या.राज्य सरकारने  चूक दुरुस्त करण्यासाठी ई-केवायसीसाठी वारंवार मुदत दिली होती. या कालावधीत २४ लाखांपैकी २० लाख महिलांनी आपली नोंद दुरुस्त करून पूर्ववत पात्रतेचा लाभ मिळवला,तर उर्वरित चार लाख महिला निकषांत न बसल्याने कायमच्या अपात्र ठरल्या.आता लाभार्थी महिलांची संख्या १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ निश्चित झाल्याने सरकारचा महिन्याचा प्रत्यक्ष खर्च २ हजार ४५९ कोटी रुपये इतका होणार आहे.यामुळे राज्य शासनाची वार्षिक सुमारे १२ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.महत्वाचे म्हणजे,नियमांनुसार ज्या लाभार्थी महिलांचे वय ६५ वर्षे पूर्ण होणार,अश्या महिला आपोआप योजनेतून बाहेर पडतील.तसेच ज्या महिलांना जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा झालेत,अश्या पात्र लाभार्थी महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा यापुढे नियमित लाभ मिळेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!