Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मंगळवारी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सरकारला खडेबोल सुनावले आहे.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,घोषणा आणि वस्तूस्थिती यात फरक असतो,हे सरकारने आधी लक्षात घ्यावं.! आधी कर्जमाफीची घोषणा केली,पण अटीशर्ती टाकून स्वतःच्याच घोषणेला कोलदांडा घातला.आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन केल्यानंतर आणि अधिवेशनात मुद्दा लावून धरल्यानंतर त्याला उत्तर देतांना अटीशर्ती काढल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.पण अंमलबजावणी मात्र अजूनही शून्य..आधीच खऱ्या दुष्काळाच्या सावटामुळं शेतकरी कमालीचा अडचणीत आहे आणि दुसरीकडं सरकार देखील त्यांच्याशी राजकीय डाव खेळत दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं वागतंय.माझी सरकारला विनंती आहे की, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा..पण शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळलात तर पेचात पडाल.कर्जमाफीसाठी आता तारीख-पे-तारीखचा खेळ बंद करा आणि तातडीने अंमलबजावणी करा.दिल्लीत सरकारची कशी फजिती सुरुय बघताय ना…? असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.त्यामुळे सरकारने हवेत गोळीबार न करता तात्काळ शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!