- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने आता रेशन दुकानांमधून लाभार्थी कार्डधारकांना मका वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे,गव्हाच्या कोट्यात कपात करून लाभार्थीना आता मका दिला जाणार आहे.चालू जुलै महिन्यात रेशन दुकानांतून लवकरच हे वितरण सुरू होणार आहे.
बऱ्याच कालावधीपासून रेशन दुकानांमधून गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येत आहे.मात्र,आता गव्हाच्या जागी मका आल्याने नागरिकांना आपल्या दैनंदिन आहारात मक्याचा वापर करावा लागणार आहे. त्यानुसार,आता अंत्योदय योजनेतील कार्डधारक लाभार्थीना २० किलो तांदूळ,८ किलो गहू आणि ७ किलो मका,असे एकूण ३५ किलो धान्य देण्यात येणार आहे.यापूर्वी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना १५ किलो गहू देण्यात येत होते.मात्र,आता गहू वितरणातील ७ किलो गहू कमी करून त्याऐवजी ७ किलो मका देण्यात येणार आहे; तर प्राधान्य गटातील कार्डधारक लाभार्थींना प्रति सदस्य १ किलो मका,३ किलो तांदूळ आणि १ किलो गहू,असे एकूण ५ किलो धान्य वाटप करण्यात येणार आहे.
- Advertisement -

