Monday, September 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट यूजी-२०२६’ ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता शिक्षक पात्रता परीक्षेला अवघे काही तास शिल्लक उरलेले असतांनाच परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने उद्या,रविवार २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीमुळे प्रशासनाने तडकाफडकी रद्द केली आहे.या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आल्याने राज्यभरातील विद्यार्थी,शिक्षक आणि नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.प्राथमिक तपासानुसार,परीक्षेचा पेपर ठाणे जिल्ह्याच्या परिसरात फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भिवंडी पोलिसांनी तपासासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली असता, संशयित व्यक्तींकडे सापडलेले प्रश्न आणि उद्या होणाऱ्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजताच परीक्षा मंडळाने कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.मात्र,हा पेपर नेमका कोणत्या टोळीने किंवा यंत्रणेमार्फत बाहेर काढला,याचा शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी दोन सत्रात होणार होती.शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक-१ रविवार,२८ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत,
तर पेपर क्रमांक २ याच दिवशी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात येणार होता.पण परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच परीक्षेचा खेळखंडोबा झाल्याने परीक्षार्थींनी अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळास नियमित भेट द्यावी,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!