Sunday, October 25, 2026
Homeनागपूर३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील पाण्यात उतरून मासे पकडणे तरुणाच्या जीवावर बेतले.सदरची घटना काल रविवारी दुपारच्या सुमारास घडली.मात्र,अद्यापही तरुणाचा शोध लागलेला नसल्याने आज,सोमवार २२ जूनच्या सकाळपासून अग्निशमन दल,जलतरण बचाव पथक आणि बोटीने शोधमोहीम सुरू आहे.स्वप्निल दीपक पाटील वय ३० वर्षे,रा.रामेश्वरी,नागपूर असे नदीत बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
रामेश्वरी परिसरातील चार मित्र काल रविवारी सकाळच्या सुमारास दुचाकीने गुमगावमार्गे कोतेवाडा येथील वेणा नदी परिसरात फिरण्यासाठी गेले होते. काही वेळ नदीच्या काठावर फेरफटका मारल्यानंतर त्यांनी पोहण्याचा निर्णय घेतला.यावेळी स्वप्निल पाटील याला नदीत मासे पकडण्याचा मोह झाला. त्याने कपडे काढून नायलॉनचे जाळे घेत वेणा नदीत प्रवेश केला.मात्र,खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडू लागला.त्याच्या तीन मित्रांसमोरच हा प्रकार घडल्याने मित्रांनी आरडाओरड करीत मदतीसाठी धावपळ सुरू केली.मात्र,तोपर्यंत खूप उशीर झाला होता.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ जलतरण बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.तसेच वानाडोंगरी आणि मिहान येथील अग्निशमन दलाच्या दोन पथकांनाही मदतीसाठी बोलावण्यात आले.बोटीने नदीत शोधमोहीम राबविण्यात आली.मात्र,अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्वप्निल पाटील यांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचून स्तब्ध झाले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!