उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.विशेष म्हणजे, राज्य शासनाने याआधी मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी नुकतेच बुधवार १० जून २०२६ रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती.त्यानुसार,काल सोमवार १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यातील सुमारे १ कोटी ७७ लाख महिला पात्र ठरल्या आहेत.मात्र,विविध त्रुटी आणि निकषांची पूर्तता न केल्यामुळे जवळपास ७० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

