- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मित्राच्या वाढदिवसानिमित्त तलवारीसारख्या हत्याराने केक कापत हवेत पिस्तूल फिरवून तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाईगिरी दाखवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले.सदरची घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कायदा हातात घेण्याचे प्रकार किती महागात पडू शकते,याची प्रचिती निदर्शनास आली आहे.
अधिक माहिती अशी की,आरोपी अल्पवयीन मुलांच्या मित्राचा वाढदिवस असल्याने अनेक केक आणण्यात आले.त्यानंतर,वाढदिवस साजरा करतांना इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने व्हिडिओ शूट केला.व्हिडिओत “दुबई में दाऊद,मुंबई में माया, बता दो सबको अपने भाई का जन्मदिन आया” असा संवाद बोलण्यात आला.यानंतर तलवारीसारख्या धारदार हत्याराने केक कापण्यात आला आणि एअर गन हवेत फिरवत प्रदर्शन करण्यात आले.हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल झाला आणि तो थेट पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला.व्हिडिओची गंभीर दखल घेत उपायुक्त नित्यानंद झा यांनी तात्काळ कळमना पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले आणि समज देत कडक शब्दांत फटकारले.त्यानंतर दोघांनी कान पकडून पुन्हा अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करणार नसल्याची कबुली देत माफी मागितल्याने बचावले,अन्यथा कोठडीची हवा खावी लागली असती.
- Advertisement -

