Tuesday, June 9, 2026
Homeगडचिरोलीदुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.या उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण,निवास व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून देत त्यांना देशातील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सक्षम करण्यात आले.
बारावी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील इच्छुक व गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यासाठी ४५ दिवसांचा निवासी क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला.संकल्प फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा,राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया,करिअर मार्गदर्शन,स्पर्धात्मक परीक्षांची तयारी,इंग्रजी संवाद कौशल्य,तार्किक विचार क्षमता,मुलाखत तंत्र आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून,आतापर्यंत ७८ विद्यार्थ्यांनी देशातील विविध नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेत यश संपादन केले आहे.यामध्ये नवनिर्मित विद्यापीठात ३६, फर्ग्युसन महाविद्यालय/विद्यापीठात ३२,अशिम प्रेमजी विद्यापीठात ६,जी.आर.एफ.विद्यापीठात २ तसेच शिव नाडर विद्यापीठ,आयआयएचएस-१ आणि एनआयटी-१ विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.
देशातील ४६ केंद्रीय विद्यापीठे तसेच शंभरहून अधिक नामांकित खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी CUET ही समान प्रवेश परीक्षा घेतली जाते.यावर्षी १५ मे ते ३१ मे दरम्यान झालेल्या या परीक्षेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. आगामी काळात CUET परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणखी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
समाज कल्याण विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. ‘मिशन-२००’ हा केवळ प्रवेश मिळवून देणारा उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास,करिअर दृष्टिकोन आणि स्पर्धात्मक क्षमतेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा शैक्षणिक प्रयोग ठरत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

येत्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन.. – समस्याग्रस्त व पीडित महिलांना वैयक्तिक तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील महिलांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या,सोमवार १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!