- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात एका ३१ वर्षीय तरुणावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.दुलेश्वर संतोष खरकाडे वय ३१ वर्षे,रा.कलपाथरी,ता.गोरेगाव,जि.गोंदिया असे वाघाने ठार केलेल्या तरुणाचे नाव असून तो घरच्या शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गावालगतच्या जंगल परिसरात गेला असता सदरची घटना घडली.
गोरेगाव तालुक्याच्या कलपाथरी गावाजवळच जंगल परिसर लागून असल्याने दुलेश्वर खरकाडे हा नेहमीप्रमाणे काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास दुचाकीने घरच्या शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी जंगल परिसरात गेला होता.दुपार झाली तरीही तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला.वारंवार फोन लावूनही फोन उचलत नसल्याने कुटूंबीय तसेच काही ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्यासाठी जंगलाकडे धाव घेत शोधाशोध केली.दरम्यान,काही अंतरावर दुलेश्वरची दुचाकी व गाडीच्या डिक्कीत मोबाइल आढळला.तर दुचाकीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर दुलेश्वरचा मृतदेह आढळून आला.लागलीच घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली.माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी केली असता परिसरात वाघाच्या पावलाचे ठसे दिसून आले.उपस्थित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला व परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
- Advertisement -

