Friday, June 5, 2026
Homeगडचिरोलीराज्याचे मुख्य सचिव उद्याला गडचिरोलीत; आत्मसमर्पित नक्षलवाद्यांशी साधणार संवाद..

राज्याचे मुख्य सचिव उद्याला गडचिरोलीत; आत्मसमर्पित नक्षलवाद्यांशी साधणार संवाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल हे उद्या,शनिवार ६ जून व रविवार ७ जून २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात ते गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत.तसेच नक्षलविरोधी उपाययोजनांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसन प्रकल्पालाही भेट देणार आहेत.
दौरा कार्यक्रमानुसार,मुख्य सचिव उद्या ६ जून रोजी सकाळी नागपूरहून गडचिरोलीकडे प्रस्थान करून जिल्ह्यातील विविध गावांना व विकासकामांच्या स्थळांना भेटी देणार आहेत.त्यानंतर त्यांचा गडचिरोली येथे मुक्काम राहणार आहे.
७ जून रोजी सकाळी १०.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नक्षलविरोधी कारवायांबाबत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत विकासकामे,सुरक्षा उपाययोजना आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.दुपारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक झाल्यानंतर मुख्य सचिव आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात आलेल्या नवजीवन वसाहतीला भेट देणार आहेत.येथे ते आत्मसमर्पित माजी नक्षलवाद्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पुनर्वसन उपक्रमांची माहिती घेणार आहेत.त्यानंतर,सायंकाळी ४.४५ वाजता नागपूरकडे प्रस्थान करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या २२ वर्षीय तरुणास अटक..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला फुस लावून पळवून नेणाऱ्या २२ वर्षीय तरुणास लाखांदूर पोलिसांनी...

खोब्रामेंढा देवस्थान परिसरात होणार दमा व इतर आजारांवर मोफत औषधीचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दरवर्षीप्रमाणे यंदाही मृग नक्षत्र दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र हनुमान देवस्थान,खोब्रामेंढा येथे  भव्य मोफत...

नवीन रेल्वे लाईन कामाच्या दृष्टीने दोन दिवस मेमू पॅसेंजर गाड्या राहणार रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.यामुळे येत्या,रविवार ७ जून...

यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे आटोपल्याने शेतकरी दरवर्षी पेरणीची घाई करतात.पण,यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव दिसून येत असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!