- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवार ५ जून २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते १९ जून २०२६ रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे,स्फोटके,दाहक पदार्थ,दगड व इतर घातक वस्तू बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.तसेच पूर्वपरवानगीशिवाय मिरवणुका,सभा, मोर्चे, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यासही निर्बंध लागू राहणार आहेत.नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
- Advertisement -

