- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित २५ हजारासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावल्याने नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली.प्रविण हरगोंविद मेश्राम वय ४७ वर्षे,पद-मंडळ अधिकारी,महसूल मंडळ पाटणसांवगी,तहसील-सावनेर, जि.नागपूर असे आरोपीचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील
तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमीनीचे फेरफार करणेकरीता मंडळ अधिकारी प्रविण मेश्राम यांनी तक्रारदाराला ७५ हजार रुपये लाचेची मागणी केली व १२ मे २०२६ रोजी ५० हजार रूपये तक्रारदार यांचेकडुन घेतले आणि शेतजमीनीचे फेरफार केले.मात्र,मेश्राम यांनी उर्वरीत २५ हजार रूपये करीता तब्बल तेरा ते चौदा दिवस तक्रारदार यांचेकडे तगादा लावला.यामुळे मानसिक त्रास होऊ लागल्याने तक्रारदार यांनी नागपूरच्या अँटी करप्शन ब्यूरो(एसीबी)येथील कार्यालयात २५ मे २०२६ रोजी तक्रार नोंदवली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी दरम्यान मंडळ अधिकाऱ्याने शेतजमीनीचे फेरफार केल्याच्या कामाचा मोबदला म्हणुन उर्वरीत २५ हजार रूपये लाच रक्कमेची पंचासमक्ष मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.सापळा कारवाई दरम्यान प्रविण मेश्राम,मंडळ अधिकारी याने २५ हजार रूपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.याबाबत नागपूर ग्रामीणच्या सावनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ.दिंगबर प्रधान पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर,श्रीमती माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधीक्षक व विजय माहुलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली,सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे,सापळा पथक श्रीमती वैशाली आठवले,पोलीस निरीक्षक मपोहवा अस्मिता मल्लेलवार,सरीता राऊत,पोहवा अनिल बहिरे,पोअं.मिलींद मेश्राम,चालक मपोअं हर्षलता भरडकर सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर यांनी केली.
- Advertisement -

