Wednesday, August 26, 2026
Homeवर्धाअज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने धडकेत दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट नजीक महामार्गावरील हॉटेल सगुना कारखान्याजवळ घडली.मृतांमध्ये पती,पत्नी आणि त्यांच्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गजानन वानखेडे वय ४५ वर्षे,पल्लवी गजानन वानखेडे वय ३८ वर्षे व आरोही वानखेडे वय ६ वर्षे अशी मृतकांची नावे असून वानखेडे कुटूंबीय वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला येथील रहिवासी होते.
वानखेडे कुटूंबीय आज सकाळच्या सुमारास एमएच ३२ एएम १६९४ क्रमांकाच्या मोपेड स्कूटीने हिंगणघाट शहराकडे कपडे खरेदी करण्यासाठी निघाले होते. दरम्यान,राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांनाच हॉटेल सगुना कारखान्याजवळ विरुद्ध दिशेने अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,दुचाकी चक्काचूर तर झालीच,पण दुचाकीवरील गजानन,पल्लवी व चिमुकली आरोही हे तिघेही रस्त्यावर दूरवर फेकले गेले.तिघांनाही गंभीर मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तात्काळ रुग्णवाहिका बोलवून तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र,रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती तिघांनाही मृत घोषित केले. अपघातात मृत पावलेली चिमुकली आरोही ही जुळी बहीण होती.दुसरी जुळी बहीण घरीच राहिल्याने ती बचावली.मात्र,अख्खे कुटुंबच अपघातात मृत पावल्याने आई-वडिलांविना ती पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!