Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरप्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.....

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंत्याला नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.रविंन्द्र निलकंठराव वानखेडे पद-अधिक्षक अभियंता,यांत्रिकी मंडळ,जलसंपदा विभाग,नागपूर असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार हे नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करजखेडा जि.भंडारा येथील १० लाख रूपयाचे आणि लखमापूर जि.नागपूर येथील १५ लाख रूपयाचे पाठबंधाऱ्यांच्या कामाचे एकुण प्रलंबित २५ लाख रूपयाचे बिल मंजूरीकरिता जलसंपदा विभाग, नागपूर येथे सादर केले होते.सदरचे बिल मंजूर करून देण्याकरिता रविंन्द्र वानखेडे यांनी २ टक्के प्रमाणे ५० हजार रूपयेची लाचेची मागणी केल्याची तक्रार यातील तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर कार्यालयात केली होती.
सदर तक्रारीचे अनुषंगाने सापळा अधिकारी यांनी काल,गुरुवार २१ मे २०२६ रोजी लाचेची मागणीबाबत पडताळणी कारवाई केली असता आरोपी रविंन्द्र वानखेडे यांनी तक्रारदार यांचे पाठबंधाऱ्याचे प्रलंबित बिल मंजुरी करिता २ टक्के प्रमाणे ५० हजार रूपये आणि नविन काम भुराटोला जि.भंडारा आणि खडकी मायनर,नागपूर येथील १० लाख रूपयाचे पाठबंधाऱ्याचे निविदा तक्रारदार यांचे नावे मंजूर करून देण्याकरिता २ टक्के प्रमाणे २० हजार रूपये असे एकुण ७० हजार रूपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने सापळा कारवाईअंती आरोपी रविंन्द्र वानखेडे यांना त्यांचेच कार्यालयात स्वतःचे कक्षात ७० हजार रूपये लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.रविंन्द्र वानखेडे यांची अंगझडती दरम्यान त्यांचे ताब्यातुन सापळा रक्कमेव्यतिरिक्त ३६,६३० रुपये जप्त करण्यात आले आहे.प्रकरणी आरोपी रविंन्द्र वानखेडे विरुध्द नागपूर शहराच्या धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर,श्रीमती माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर,विजय माहुलकर अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार,पोलीस निरीक्षक जितेंन्द्र वैरागडे, मपोहवा अस्मिता मेश्राम,करूणा सहारे,गिता चौधरी, पोहवा आशिष वैद्य,पोशि प्रफुल भातुलकर,होमेश्वर वाईलकर आणि वाहन चालक राजेंन्द्र जांभुळकर यांनी केली.
  • नागरिकांना आवाहन👇
नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर या जिल्ह्यांतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम(एजंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशिर शासकीय शुल्का व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर येथे संपर्क साधावा.तक्रारदारांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यात येईल व तक्रारदार यांचे सापळा कारवाईत वापरण्यात आलेली रक्कम ही एका महिण्याचे आत परत केल्या जाईल. तसेच तक्रारदारांचे शासकीय विभागात अडकलेले वैध कामही पुर्ण करून दिले जाईल.
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा👇
१. पोलीस अधीक्षक कार्यालय दुरध्वणी क्र.०७१२-२५६१५२०
२. टोल फ्री क्रमांक : १०६४, व्हॉट्सॲप
क्र.९०६७६७१०६४
३. डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र.९९२३१८५५६६
४. माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र.७०३८४३६४४१
५. विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र.९९२३१४२५६९
६. अनिल जिट्टावार,पोलीस उपअधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र.९८२३२७०५८१
७. राजीव कर्मलवार,वाचक पोलीस निरीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र.९०२१४५२७६०
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!