Saturday, May 30, 2026
Homeगडचिरोलीडिजिटल युगातही आदिवासी बांधवांची रुग्णवाहिका ठरतेय कावडच- रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी खाटेचा पाळणा

डिजिटल युगातही आदिवासी बांधवांची रुग्णवाहिका ठरतेय कावडच- रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी खाटेचा पाळणा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सध्याचे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जात आहे.असे असले तरी या डिजिटल युगात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी बांधव आपल्यापेक्षा अनेक वर्षे मागे असल्याचे दिसून येत आहे.पूर्वीच्या युगात कावडीचा वापर केला जात होता.तशीच परिस्थिती आजच्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात पहावयास मिळते आहे.जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांतील रुग्णांना उपचारासाठी खाटेची कावड करून पायपीट करीत रुग्णालयात न्यावे लागत आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांसाठी कावड हीच रुग्णवाहिका ठरत आहे.

 गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील हा परिसर अबुझमाड म्हणून ओळखला जातो.या अतिदुर्गम,आदिवासीबहुल डोंगराळ भागातील आदिवासींना उपचारासाठी भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय पर्याय नाही.त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर छत्तीसगड राज्यातील जवळपासचे आदिवासी बांधवसुद्धा याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात.अनेक गावे अशी आहेत जिथे वाहन जायला रस्तासुद्धा नाही.त्यामुळे खाटेचा कावडच वापरावा लागत आहे.जिल्ह्यातील अनेक सीमावर्ती भागात अजूनही रस्त्यांचा अभाव असल्यामुळे आदिवासी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.या भागातील एखाद्या रुग्णास वेळेवर उपचार मिळणे कठीण आहे.रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रुग्णांना खाटेचा पाळणा करून रुग्णालयात आणावे लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास अनेकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले आहे.आम्हाला जेवढे मिळतेय तेवढे कमीच आहे.मात्र अतिदुर्गम,आदिवासीबहुल,डोंगराळ भागातील आदिवासी बांधव अजूनही हाल अपेष्टा सहन करून कसेबसे उदरनिर्वाह करून जीवन जगतांना हल्ली दिसून येतात.तरी सुद्धा पोकळ आश्वासने देणारे आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष करीत असल्याने किती शरमेची व लाजिरवाणी बाब आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!