Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही; मनोज जरांगे पाटीलांची आंदोलनाची...

एकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही; मनोज जरांगे पाटीलांची आंदोलनाची घोषणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.आज, शनिवार १६ मे रोजी मराठा समन्वयक समितीची बैठक पार पडली.या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे.येत्या,शनिवार ३० मे २०२६ रोजी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी ते उपोषणाला बसणार आहेत.३० मे पासून आपण आमरण उपोषण करणार आहे.तसेच राज्यभरात शांततेत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.यामुळे आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.आंदोलन सुरू व्हायच्या आधी सरकारने आंदोलनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी.एकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही आणि आपण कुणाचेही ऐकणार नाही,अशी थेट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सरकारने ३० तारखेच्या आत मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.३० तारखेनंतर सरकारसाठी वेळ वाढवून देणार नाही. सातारा,पुणे आणि कोल्हापूर संस्थानाचं गॅझेट सरकारने लागू करावे.तसेच मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.सरकारने मराठा आरक्षणाबाबतची उपसमिती बरखास्त करावी,आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा,हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप थांबले आहे.ते पुन्हा सुरू करा. ११९४ च्या धर्तीवरच आम्हाला जीआर हवा आहे. अन्यथा सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही,अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!