Tuesday, October 6, 2026
Homeनागपूरउपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी परिसरातील महालक्ष्मी जगदंबा मंदिराशेजारी उभारली जात असलेल्या या भव्य बजरंगबलीच्या मूर्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.जवळपास जून महिन्यापर्यंत या संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.त्यानंतर,भव्य लोकार्पण सोहळा पार पाडण्यात येईल,असे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.मध्य भारतातील सर्वात उंच आणि आकर्षक हनुमान मूर्ती म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.या संपूर्ण संरचनेची उंची फाउंडेशनसह तब्बल २०६ फूट असून,प्रत्यक्ष मूर्तीची उंची १६२ फूट आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भगवान हनुमानांच्या हातातील ७४ फूट उंचीची विशाल गदा. जगातील सर्वात मोठ्या गदांमध्ये तिची गणना होणार असून,तिची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.या गदेची भव्यता पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.या संपूर्ण प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.मूर्तीवर विशेष धातूचा लेप देण्यात आला असून त्यामुळे ती अधिक आकर्षक,चमकदार आणि टिकाऊ बनली आहे. रात्रीच्या वेळी विशेष लाईटिंग आणि प्रोजेक्शन मॅपिंगच्या साहाय्याने ही मूर्ती विविध रूपांमध्ये पाहायला मिळणार आहे.एवढेच नाही तर प्रोजेक्शनच्या माध्यमातून हनुमान चालीसाचं सादरीकरणही करण्यात येणार आहे.त्यामुळे भाविकांना धार्मिक अनुभवासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचाही अनोखा अनुभव घेता येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!