Friday, August 14, 2026
Homeगडचिरोलीसौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही योजना कोणतीही उधळपट्टीची नसून जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या,शेतकरी गट आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार लोकहितासाठी आखलेली नाविन्यपूर्ण योजना आहे,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी स्पष्ट केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राणी-मनुष्य संघर्षासोबतच भटक्या व मोकाट जनावरांमुळे रबी व उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे,उत्पादनक्षमता वाढावी आणि गटशेतीला चालना मिळावी,या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.योजनेअंतर्गत शेतकरी गटांना प्रकल्प खर्चाच्या ९५ टक्के अनुदानाची तरतूद असून यंत्रसामग्री खरेदी करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य लाभार्थी गटांना देण्यात आले आहे.या योजनेला सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त असून लाभार्थी निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पारदर्शक तत्त्वावर तालुकास्तरावरून केली जाते.सौर कुंपण खरेदी प्रक्रिया पूर्णपणे लाभार्थी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत केली जाते.कृषी विभागाचा खरेदी प्रक्रियेत कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप नाही.आवश्यक कागदपत्रे,जीएसटी देयके आणि जिओ-टॅग केलेल्या छायाचित्रांची पडताळणी झाल्यानंतरच अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
यंत्रांच्या दर्जाबाबत उपस्थित करण्यात आलेले संशयही निराधार असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. योजनेत वापरले जाणारे ‘झटका मशीन’ हे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांनी विदर्भासाठी शिफारस केलेले व संशोधित यंत्र असून त्याचे आवश्यक चाचणी अहवाल प्रत्येक प्रस्तावासोबत संलग्न आहेत.
वन विभागाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची तुलना या योजनेशी करणे योग्य नाही.वन विभागाची योजना प्रामुख्याने वनक्षेत्राच्या पाच किलोमीटर परिघातील क्षेत्रासाठी व वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी मर्यादित आहे.मात्र कृषी विभागाची ही योजना शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांसाठी असून वन विभागाच्या योजनेसाठी पात्र न ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती उपयुक्त ठरत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात भटक्या व मोकाट जनावरांमुळे शेतीपिकांचे नुकसान ही गंभीर समस्या आहे.त्यामुळे अशा जनावरांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे.त्यामुळे ही योजना शेतकरी स्तरावरून मागणी असलेली आणि शेती संरक्षणासाठी उपयुक्त ठरणारी आहे,असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
योजना पूर्णपणे कायदेशीर,तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि शेतकऱ्यांच्या हिताची आहे.या संदर्भातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर व्हावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सर्व ग्रामपंचायतींमध्ये पीएम आवास योजनेच्या अंतिम प्रतीक्षा यादी निश्चितीसाठी ग्रामसभा…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत Awaas+ २०२४ सर्वेक्षणातील लाभार्थ्यांची कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये उद्या,१५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा...

मादी बिबट्याच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक-२३४ राखीव वनामध्ये गुरुवार,१३ ऑगस्ट रोजी एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात...

गडचिरोलीत उभारणार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’- मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत – झाडीबोली संमेलनासाठी दरवर्षी २५ लाखांचा निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मराठी भाषेचे संवर्धन,स्थानिक बोलीभाषांचे जतन-संवर्धन,संशोधन आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘मराठी भाषा विकास व संशोधन...

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!