- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल झाल्याने आज,शनिवारी दोन्ही पात्र उमेदवारांचा समाज बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ,शाल व भेटवस्तू देत सत्कार करण्यात आला.
नुकतीच जिल्हा पोलीस भरतीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुरखेडा शहरातील जाकीर शेख यांची कन्या आफरीन शेख व फीरोज उर्फ पप्पू खान यांचे सूपूत्र अदनान खान हे पात्र ठरले.यांचा आज समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुस्लिम समाजात शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता आहे.विशेषतः मुस्लिम युवक व युवती शिक्षण घेत आपण शासकीय, खाजगी सेवेत दाखल होऊन आपले भविष्य घडवू शकतो,या आत्मविश्वासाचा अभाव आहे.मात्र, आफरीन हिच्या यशाने मुस्लिम समाजातील युवतींनाही बळ व प्रेरणा मिळेल,असा विश्वास यावेळी समाजाचे अध्यक्ष हाजी मसूद शेख यांनी व्यक्त केला.याप्रसंगी मुस्लिम समाज मंडळाचे उपाध्यक्ष शमीम शेख,आसिफ शेख, जियाभाई सय्यद,शहेबाज शेख, उस्मान पठाण, जाकीर शेख,नसीम पठाण व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
- Advertisement -

