- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक कॉलनीत घडली.लाभांश कुलदीप चंदनखेडे वय ३ वर्षे असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
कोंढाळी येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या चंदनखेडे कुटुंबियांच्या घराशेजारी मोकळ्या जागेत मोठा खड्डा असल्याने खड्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे.साचलेल्या सांडपाण्यामुळे खड्ड्याला छोट्या तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.घटनेच्या एक दिवसांपूर्वी चिमुकल्याची आई घरकामात व्यस्त असतांना खेळता-खेळता तो घराबाहेर गेला आणि त्या खड्याजवळ पोहोचला.अंधार पडूनही लाभांश घरी व परिसरात दिसत नसल्याने पालकांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.दरम्यान,काही वेळाने लाभांश हा खड्ड्यातील साचलेल्या घाणेरड्या पाण्यात बुडाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. लागलीच नागरिकांनी त्याला खड्यातून बाहेर काढत प्रथमतः कोंढाळी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले.त्यानंतर,वडिलाने त्याला नागपूर शहराच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित करताच कुटुंबियांवर मोठा आघात झाला.
- Advertisement -

