Monday, August 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्यापासून कृषी केंद्र चालक बेमुदत संपावर..

उद्यापासून कृषी केंद्र चालक बेमुदत संपावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि कृषी केंद्र चालकांची होणारी कुचंबणा याविरोधात राज्यातील कृषी केंद्र चालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.यासाठी उद्या,सोमवार २७ एप्रिलपासून राज्यातील सर्व कृषी केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय कृषी केंद्र चालकांच्या संघटनेने घेतला आहे.आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही,असा रोखठोक पवित्रा संघटनेने घेतला आहे. महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टीसाईड्स आणि सीड्स डिलर्स असोसिएशनने कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याची खंत व्यक्त केली आहे.विक्रेत्यांच्या संघटनेने कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण)यांना सादर केलेल्या निवेदनात बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशके विक्री व्यवसायातील अनेक गंभीर अडचणींचा उल्लेख केला आहे.खतांच्या पुरवठ्यातील ‘लिंकींग’ पद्धत बंद करण्याची मागणी करण्यात आली असून,शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर तातडीने बंदी घालावी.याशिवाय ‘साथी’ पोर्टलचा वापर विक्रेत्यांवर सक्तीने न लादता तो उत्पादक व पुरवठादार कंपन्यांपर्यंत मर्यादित ठेवावा, अशी मागणी पुढे आली आहे.बियाणे सॅम्पल फेल झाल्यास केंद्र चालकांवर कोर्ट केसेस करण्याऐवजी त्याची पूर्ण जबाबदारी उत्पादक कंपन्यांवर निश्चित करावी आणि केंद्र चालकांना केवळ साक्षीदार म्हणून ग्राह्य धरावे. तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असलेले ‘साथी’ ॲप दुकानदारांवर लादणे थांबवून प्रशासनाने थेट कंपन्यांच्या गोदामातूनच सॅम्पल तपासणी करावी.खत कंपन्यांकडून होणारी बेकायदेशीर लिंकिंग विक्री,युरिया व डीएपी विक्रीसाठी सात-बारा पाहण्याची जाचक अट आणि मुदतबाह्य कीटकनाशके परत न घेणाऱ्या कंपन्यांची मनमानी यावरही निवेदनातून ताशेरे ओढले आहेत.अवैध बियाणे विक्रीवर कारवाई करण्याऐवजी केवळ अधिकृत दुकानदारांना किरकोळ त्रुटींसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही कृषी केंद्र चालकांनी केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!