Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीविद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहे.स्पर्धा निबंध लेखन स्वरूपात असून निबंधाचा विषय ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य’ असा आहे.निबंध स्पर्धा ही मराठी भाषेत असून स्पर्धचे दोन गट ठेवण्यात आले आहेत.गट एक मध्ये आय.टी.आय./डिप्लोमा प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी/बायफोकल व एमसीव्हिसी(mcvc)विद्यार्थ्यांसाठी ५०० ते ८०० शब्द मर्यादा असेल व गट दोनमध्ये पुरुष/महिला खुला गटासाठी ८०० ते १२०० शब्द मर्यादा असेल.निबंध मूळ(सत्यप्रत)असावा.कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल.प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर सुस्पष्ट आणि सुसंस्कृत असावा.निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल.मात्र अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपातच करणे आवश्यक आहे.निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 लिंकवर अपलोड करावा.पूर्ण नाव,गट क्रमांक,संपर्क क्रमांक,आयटीआय/शाळा/महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता ही माहिती स्पर्धकांनी भरावी.निबंधाचे मूल्यांकन मांडणी,भाषा,मौलिकता,दृष्टिकोन आणि सर्जनशीलता या निकषांवर केले जाईल.विजेत्यांना अनुक्रमे प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये,द्वितीय २१ हजार व तृतीय ११ हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईल. स्पर्धेचा निकाल अधिकृत माध्यमातून जाहीर करण्यात येईल.आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील.सर्व स्पर्धकांनी आपला निबंध २० एप्रिल २०२६ पर्यंत निर्धारित वेळेत सादर करावा.अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली या कार्यालयास संपर्क करावा.जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा,असे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन व केंद्राचे  सहाययक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!