Friday, October 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तऑनलाईन फसवणुकीत बँकेलाच द्यावी लागली लाखो रुपयांची रक्कम परत.. - ग्राहकाची चूक...

ऑनलाईन फसवणुकीत बँकेलाच द्यावी लागली लाखो रुपयांची रक्कम परत.. – ग्राहकाची चूक नसेल आणि त्याने त्वरित तक्रार केली असेल,तर त्याचे दायित्व असते शून्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारतातील बँकांची बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, बँकेतील एखाद्या ग्राहकाच्या खात्यात न कळत रक्कम जमा झाली वा एखादी ऑनलाईन फसवणूक झाली तर ग्राहकाने तात्काळ बँकेशी संपर्क साधून तक्रार दाखल करावी वा त्याची माहिती त्वरित संबंधित बँकेला द्यावी. यात ग्राहकाची चूक नसेल आणि त्याने त्वरित तक्रार केली असेल,तर त्याचे दायित्व शून्य असते.त्यामुळे ग्राहकाचा निष्काळजीपणा सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेची जरी असली,तरीही ग्राहकाने वेगाने पावले उचलल्यास निष्काळजीपणाचा ठपका हा संबंधित बँकेला लागू होतो आणि तसेच झाले एका व्यावसायिकाच्या प्रकरणात.चार वर्षांपूर्वी अनधिकृत ऑनलाईन व्यवहारांद्वारे ३८.०४ लाख रुपये गमावलेल्या पुण्यातील व्यावसायिकाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला.न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने व्यवसायिक सुबोध कोर्डे यांनी गमावलेली रक्कम परत देण्याचे आदेश एचडीएफसी बँकेला दिले.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झीरो लायबिलिटी अंतर्गत परताव्यासाठी ते पात्र असल्याचे स्पष्ट केले.
  • काय आहे प्रकरण?👇
पुण्यातील व्यवसायिक सुबोध कोर्डे यांच्या बँक खात्यातून ४१ मिनिटांत ८ अनधिकृत व्यवहारांद्वारे फसवणूक झाली होती.त्यांच्या व्यवहारांची मर्यादा चार लाख रुपयांवरून ४० लाखांपर्यंत वाढवली होती. हे व्यवहार आपण केले नसून त्यासाठी कोणताही ओटीपी मिळाला नसल्याचा दावा करून बँकेला पैसे देण्याचे आदेश द्या,अशी विनंती याचिका कोर्डे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.त्यावर न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठात सुनावणी झाली. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ६ जुलै २०१७ च्या परिपत्रकाचा आधार घेत खंडपीठने ग्राहकाचा निष्काळजीपणा सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेची आहे.विशेष म्हणजे,ग्राहकाच्या बाजूने निष्काळजीपणाचा पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवीत ग्राहकाला तब्बल ३८.०४ लाख रुपयाची रक्कम देण्याचे आदेश बँकेला दिले.याचिका निकाली लागताच याचिकाकर्त्याचा आनंद काहीकाळ गगनात मावेनासा झाला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!