- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सीबीआय नागपूरच्या पथकाने मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय वित्त व्यवस्थापक कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अकाउंटंटला दोन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल केला आहे.संजीतकुमार असे आरोपी अकाउंटंटचे नाव असून त्याने रेल्वेत कार्यरत ट्रॅकमॅनकला पैश्याची मागणी केली होती.
प्रकरणातील तक्रारदार ट्रॅकमॅन अकोला जिल्ह्यात कार्यरत असून ‘एमएससीपी’ अंतर्गत त्यांचा ५८ हजार ७०० रुपयांचा एरिअर्स थकीत होता.त्याबाबतचा प्रस्ताव मूर्तिजापूर कार्यालयातून भुसावळला पाठविण्यात आला होता.तक्रारदाराने १३ मार्च रोजी संबंधित कामासाठी संजीतकुमारची भेट घेतली; परंतु संजीतने त्यांना फाईलवर प्रक्रिया करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली.जर पैसे दिले नाही तर प्रस्ताव तेथेच धूळखात पडला राहील,अशी धमकीदेखील दिली.आपल्याच हक्काच्या पैशांसाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने ट्रॅकमॅनने दोन दिवसांपूर्वी थेट सीबीआय कार्यालयाला पत्र लिहून तक्रार केली. त्यानंतर,सीबीआयच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली.संजीतकुमारने तक्रारदाराला दोन हजारांत काम करून देईन,असे सांगितले. सीबीआयच्या पथकाने संजीतकुमारविरोधात गुन्हा दाखल केल्याने रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे,संजीतकुमारने आणखी किती जणांकडून अश्या प्रकारची वसुली केलीय,याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

