Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीजागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली; दुर्गम भागातील वैद्य-पुजाऱ्यांचा ‘आरोग्य दूत’ म्हणून...

जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली; दुर्गम भागातील वैद्य-पुजाऱ्यांचा ‘आरोग्य दूत’ म्हणून पुढाकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” या ब्रीदवाक्याला अनुसरून जागतिक आरोग्य दिनानिमित्त गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली.सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथून काढण्यात आलेल्या भव्य आरोग्य जनजागृती रॅलीत अधिकारी-कर्मचारी,वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ तसेच दुर्गम भागातील पारंपरिक वैद्य व पुजाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दुर्गम भागातील गावांतून आलेल्या पारंपरिक वैद्य व पुजाऱ्यांचा सहभाग. जीवन पुंगाटी,रामा कुले,रामजी कुलेटी,डोलू तिम्मा आणि तोडसा पेठा परिसरातील प्रतिनिधींनी समाजाला अघोरी उपायांऐवजी शासकीय दवाखान्यात उपचार घेण्याचे आवाहन केले. “आजारी व्यक्तींना वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करा आणि विज्ञानाधारित उपचारांची निवड करा,” असा संदेश देत त्यांनी विज्ञानाची कास धरण्याची शपथ घेतली.या आरोग्य दूतांच्या पुढाकारामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासोबत आधुनिक उपचारांची स्वीकार्यता वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी “माझं गाव,आरोग्य संपन्न गाव” हा लोकसहभागाचा मंत्र देत आरोग्य ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती लोकचळवळ व्हावी,यावर भर दिला.प्रत्येक नागरिकाने आरोग्याबाबत सजग राहून प्रशासनाला सहकार्य केल्यास गडचिरोली जिल्हा आरोग्य निर्देशांकात राज्यात अव्वल स्थान मिळवू शकतो,असे त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी ग्रामीण भागातील सामाजिक रचना लक्षात घेऊन पुजारी व पारंपरिक वैद्य यांना ‘आरोग्य दूत’ म्हणून संबोधण्याचा अभिनव दृष्टिकोन मांडला.समाजात त्यांच्या शब्दाला असलेला मान लक्षात घेता,त्यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती अधिक प्रभावीपणे पोहोचू शकते,असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांवर भर देत लसीकरण, स्वच्छता आणि पोषक आहार यांचे महत्त्व पटवून दिले. “आजारी पडल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊच नये,यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी पारंपरिक श्रद्धांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देण्याचे आवाहन केले.तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवा कशा देत आहे,याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात वैद्य व पुजाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती पुस्तिका देऊन जनजागृतीसाठी प्रेरित करण्यात आले. उपस्थितांनी आरोग्यासाठी विज्ञानाची कास धरण्याची सामूहिक शपथ घेतली.या उपक्रमामुळे दुर्गम भागात आरोग्य सेवांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार असून,लोकसहभागातून आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया उईके,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोटूळे,भीषक तज्ञ डॉ. मनीष मेश्राम,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बागराज धुर्वे,तालुका आरोग्य अधिकारी धानोरा डॉ.पंकज हेमके, तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश खोरगडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन राहुल कंकनालवार यांनी केले.विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!