Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाआठ वर्षीय चिमुकल्याचा तलावात पडून मृत्यु.. - कुरखेडा तालुक्यातील घटना

आठ वर्षीय चिमुकल्याचा तलावात पडून मृत्यु.. – कुरखेडा तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-शाळेलगतच्या तलावाजवळ शौचास बसलेल्या एका आठ वर्षीय चिमुकल्याचा तलावात पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कुरखेडा तालुक्याच्या वडेगाव येथे काल शुक्रवारी घडली आणि आज,शनिवार २८ मार्च रोजी सर्वत्र उघडकीस आली.वेदांत शंकर पदा वय ८ वर्षे,रा.नवेझरी, ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे मृत चिमुकल्याचे नाव असून तो वडेगाव येथील क्रांतीवीर नारायणसिंह उईके आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होता.
वेदांत हा काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास शाळेजवळ असलेल्या तलावाजवळ शौचास बसला असता अचानकपणे त्याचा तोल जाऊन तलावातील पाण्यात पडला.तलाव पाण्याने भरलेला असल्याने त्याच्या नाका-तोंडात पाणी गेले.घटनेची माहिती मिळताच आश्रम शाळेचे अधीक्षक एच.डी.टेंभुर्णे, शाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले व त्याला तातडीने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली.प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय संदीप ताराम करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!