Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीबिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू..

बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-हिंस्त्र प्राणी मानवी वस्त्यांकडे शिकार शोधू लागल्याच्या घटना बऱ्याच ठिकाणी उघडकीस आल्या आहेत.त्यांच्या क्षेत्रात गेल्यास हल्ला तर होतेच, पण आता आपली वस्ती सोडून दुसऱ्यांच्या वस्त्यात शिकार करणे,हे कितपत योग्य आहे; असे म्हणण्याची वेळ आली आहे.अश्याच प्रकारे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची शहरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.बिबट्याने दोन वासरांवर हल्ला चढवल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन्ही वासरांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे,मंगळवारी एका वासरावर आणि काल शुक्रवारी परत एका वासरावर शहरातील वामन मोहुर्ले यांच्या घराजवळ बिबट्याने हल्ला चढवला होता.यात गंभीर जखमी झाल्याने दोन्ही वासरे मृत पावली.घटनेची माहिती मिळताच वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील पाहणी केली.दरम्यान,आढळलेल्या पाऊल खूनांवरून बिबट्याची करामत असल्याचा प्राथमिक अंदाज वनकर्मचाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.परिसरातील नागरिकांवर हल्ला चढवण्यापूर्विच वन विभागाने ठोस उपाययोजना करावी; अशी मागणी कोरची शहर वासियांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!