Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.....

चंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.. – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज,मंगळवार ३ मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण पहावयास मिळणार आहे.या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचे काम तसेच अंधश्रध्देला खतपाणी घातले जात असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने(अंनिस)ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही,असे असतांना देखील राष्ट्रीय वाहिन्या आणि सोशल मिडियावर सातत्याने ग्रहण विषयी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. एका बाजूला चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणारा आपला देश अजून ग्रहणासंबंधी अंधश्रद्धांना बळी पडतो आहे.त्यामुळे,ग्रहणाबाबत अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात,डॉ.हमीद दाभोलकर,मिलिंद देशमुख,नंदिनीं जाधव,रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर अण्णा कडलास्कर,डॉ.अशोक कदम, मुंजाजी कांबळे,प्रकाश घादगिने,मुक्ता दाभोलकर,फारुख गवंडी प्रवीण देशमुख आदींनी केली आहे.चंद्रग्रहण ही एक साधी खगोलीय घटना आहे.त्यामध्ये कोणतीही नवीन ऊर्जा किंवा किरणे तयार होत नसतात.दर सहा महिन्यानंतर पृथ्वी,चंद्र आणि सूर्य यांच्या समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो. तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करणे असेल उदाहरणार्थ भाजी चिरणे कात्री वापरणे हे सर्व करीत राहण्यास कोणतीही अडचण नसते किंवा त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो.गर्भवती स्त्रीने झोपले किंवा पाय क्रॉस करून बसले किंवा चाकू कात्री वापरली असे काहीही केले तरीही गर्भावर यत्किंचितही दुष्परिणाम होत नसतो हे लक्षात घ्यावे; असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!