Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीदुचाकी अपघात; नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापतीचा दुर्दैवी मृत्यू..!

दुचाकी अपघात; नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापतीचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहरातील चंद्रपूर मार्गावरील कारगिल चौक परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकीने घराकडे  निघालेल्या धावत्या दुचाकीला गावठी डुकराने जोरदार धडक दिली.धडक बसताच दुचाकी वाहन अनियंत्रित होऊन फरफटत गेले.यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.मुक्तेश्वर काटवे वय ५६ वर्षे, रा.गडचिरोली शहर असे अपघातात मृत पावलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून ते गडचिरोली नगर परिषदेत स्वच्छता व आरोग्य सभापती होते.विशेष म्हणजे,काटवे हे भाजपचे पदाधिकारी होते.मुक्तेश्वर काटवे हे दुचाकीने रात्रीच्या सुमारास गडचिरोली शहरातील कारगिल चौकमार्गे आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले होते.जात असतांना वाटेतच गावठी डुक्कर त्यांच्या दुचाकीला येऊन जोरदार आपटला.यात वाहनावरील तोल गेल्याने त्यांना गंभीर मार लागला.त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा रात्रीच दुर्दैवी मृत्यू झाला.मुक्तेश्वर काटवे यांच्या पार्थिवावर आज,शनिवार २८ फेब्रुवारी रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!