उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून दरात घसरण अनुभवणाऱ्या मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत आता पुन्हा एकदा ‘तेजी’चे वारे वाहू लागले आहेत. नागपूरच्या सराफा बाजारात काल सोमवारी सोन्याच्या दरात १ हजार ३४५ रुपयांची वाढ झाली असून,चांदीने तर सर्व विक्रम मोडीत काढत एकाच दिवसात १६ हजार १५० रुपयांची मोठी झेप घेतली आहे.सोमवार २३ फेब्रुवारीला सोने ३ टक्के जीएसटीसह १ लाख ६४ हजार ६०० रुपये,तर चांदीचे भाव २ लाख ७९ हजार ८५० रुपयांवर पोहोचली आहे.काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीमुळे सोने-चांदीचे दर कमी झाले होते.मात्र,जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे दरात वाढ होऊ लागली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मूल्यात होणारे बदल आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.अश्यातच सोने-चांदीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.
आता पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात ‘तेजी’चे वारे..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

