Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीनक्षल चकमकीत शहीद जवानास शासकीय इतमामात मानवंदना..

नक्षल चकमकीत शहीद जवानास शासकीय इतमामात मानवंदना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अबुजमाड जंगल परिसरात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान वीरगती प्राप्त झालेले सी-६० पथकाचे जवान(कमांडो)दीपक चिन्ना मडावी वय ३८ वर्षे,रा.मांड्रा-दामरंचा,ता.अहेरी,जि.गडचिरोली यांना आज,शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानास अंतिम सलामी देण्यात आली. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल,पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल,केंद्रीय रिझर्व पुलिस बल उप महानिरीक्षक(परिचालन)अजय शर्मा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
नक्षलविरोधी कारवाईदरम्यान कर्तव्य बजावत असतांना शहीद झालेले दीपक मडावी यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान कधीही विसरले जाणार नाही,त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात प्रशासन आणि पोलीस दल त्यांच्या पाठीशी उभे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.मानवंदना कार्यक्रमानंतर शहीद दीपक चिन्ना मडावी यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी अहेरी तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी दामरंचा येथे रवाना करण्यात आले. मार्गक्रमणादरम्यानही पोलीस दलाच्या वतीने सन्मान राखण्यात आला.
अबुजमाड जंगल परिसरात काल शुक्रवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सी-६० कमांडो दीपक चिन्ना मडावी गंभीर जखमी झाले होते.त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भामरागड येथे हलविण्यात आले.मात्र,उपचारादरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांना वीरमरण आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!