Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियामहिना लोटूनही तरुणीच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात..

महिना लोटूनही तरुणीच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील हरदोली गावातून २३ डिसेंबर २०२५ पासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह सालेकसा तालुक्याच्या पुजारीटोला धरणात आढळला होता.कल्पना तेजराम भोयर वय २३ वर्षे,रा.हरदोली,ता.देवरी, जि.गोंदिया असे मृत मुलीचे नाव आहे.घरातून बेपत्ता झाल्यानंतर घरच्या मंडळींनी गावासह नातेवाईकाकडे शोध घेतला,परंतु ती कुठेच सापडली नाही.याची तक्रार फिर्यादी वडील तेजराम भोयर यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही.त्यातच कल्पनाचा मृतदेह २८ डिसेंबर २०२५ रोजी धरणात आढळला होता.पोलिसांनी तंटामुक्त समितीच्या व पोलिस जमादार यांच्या समक्ष पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली होती. मात्र,आज महिना लोटूनही कल्पनाची हत्या की आत्महत्या?याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. त्यातच,पोलीस विभागाकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे व तपास झाल्यावर नक्कीच नियमानुसार कारवाई केली जाईल,अशी बतावणी करून हातवर केले जात असल्याने गरिबांच्या प्रकरणात चालढकल केली जात असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!