Saturday, June 20, 2026
Homeनागपूरट्रकची मागून जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू..

ट्रकची मागून जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका दैनिक पेपरच्या प्रेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या दुचाकीला काँक्रीट मिक्सर तयार करणाऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक देत ट्रकचे पुढचे चाक आणि संपूर्ण वाहन शरीरावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपघातात मधुकर नामदेव गोतमारे वय ५६ वर्षे असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव असून ते गेल्या आठ वर्षांपासून दैनिक भास्कर प्रेसमध्ये काम करत होते.
मधुकर गोतमारे हे आज सकाळच्या सुमारास एमएच ४९ बीसी ०५९४ क्रमांकाच्या दुचाकीने कामावर जात असतांना जयताडा रोडवरील गुडलक सोसायटीजवळ वळण घेत असतांना मागून आलेल्या एमएच ४९ बीझेड ७१९९ क्रमांकाच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने त्यांना चिरडले. यात गोतमारे हे जागीच गतप्राण झाले.घटना घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून ट्रक ठेऊन पसार झाला. जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.पोलिसांना माहिती देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गोकुळ महाजन,पीएसआय वैशाली सोळंके,कॉन्स्टेबल श्रेयस फलकाडे,रवींद्र नेतानराव,राजू खडतकर आणि ट्रॅफिक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघातग्रस्त ट्रक वाडी येथील अदानी प्लांटमधून काँक्रीट घेऊन जात असतांनाच सदरचा अपघात घडला.प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!