Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज बँका सुरू राहणार की बंद..अनेकजण संभ्रमात..!

आज बँका सुरू राहणार की बंद..अनेकजण संभ्रमात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बँकांना सलग तीन दिवस सुट्ट्या राहिल्याने अनेकांचे बँकेशी होणारे व्यवहार ठप्प पडले आहेत.विशेष म्हणजे,काहींचे चेक बँकेत अडकून पडले आहेत.तर काहींना पैसा असूनही मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.अश्यातच शनिवार,रविवार आणि सोमवारच्या सुट्ट्या नंतर आज,मंगळवार २७ जानेवारी रोजी बँका सुरू राहणार की बंद राहणार?अश्या संभ्रमात अनेकजण पडले आहेत.त्यातच,बँकांची बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना सुट्टी जाहीर केलेली नाही,तर आज मंगळवारी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ (युएफबीयु)देशभर बँक संप करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे आज मंगळवारी अनेक ठिकाणी बँक शाखा बंद राहू शकतात आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.यात देशातील सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश असेल.यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया,कॅनरा बँक,पंजाब नॅशनल बँक,बँक ऑफ बडोदा,इंडियन बँक यांसह इतर सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश आहे.अनेक शहरांमध्ये कर्मचाऱ्यांनी आधीच निदर्शने सुरू केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी
पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा ही प्रमुख मागणी असल्याने सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्यतेचे ठणार आहे.’युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ हे ९ प्रमुख बँक युनियन्सचे संयुक्त व्यासपीठ आहे.ही संघटना सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही जुन्या खाजगी बँकांच्या कर्मचाऱ्यांचे  प्रतिनिधित्व करते.संपामुळे देशातील अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये बँकेचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!