Wednesday, October 21, 2026
Homeब्रम्हपुरीहयात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने रकमेची उचल करणे पडले महागात- तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचास...

हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने रकमेची उचल करणे पडले महागात- तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचास झाली अटक- माहिती अधिकार अर्जाद्वारे प्रकरण उघडकीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रम्हपुरी :- तालुक्यातील उदापूर ग्रामपंचायतीमध्ये १६,२०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी उदापूरचे तत्कालीन ग्रामसेवक दिनेश श्रावण येरणे व तत्कालीन सरपंच योगेश तात्याजी तुपट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तत्कालीन सरपंचासह त्यांना अटक करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत उदापूरला सन २०१० ते २०१५ या कालावधीत सरपंच पदावर योगेश्वर तात्या तुपट व ग्रामसेवक दिनेश येरणे कार्यरत होते.यादरम्यान पाणीपुरवठा योजना सुरू झाली.ग्रामपंचायतीमध्ये शिपाई कार्यरत असतांना पुन्हा पाणीपुरवठा मदतगार म्हणून उदापूर येथील एका व्यक्तीची प्रती दिवस १०० रुपये मजुरी प्रमाणे नियुक्ती करण्यात आली.याच व्यक्तीकडे घरगुती नळ जोडणीचे कामसुद्धा देण्यात आले होते.नळ जोडणीचेसुद्धा व्हाऊचरद्वारे रकमा दिल्या.हा प्रकार कळताच मंडपे यांनी माहिती अधिकार २००५ नुसार माहिती मिळवून मिळालेल्या दस्तावेजाची बारकाईने तपासणी केली असता दोषी आढळून आले. 

उदापूरमध्ये हयात नसलेल्या व्यक्तीचे नाव ग्रामपंचायत मजुरी हजेरी पटावर नोंदवून,त्याच्या नावाने स्वाक्षरी करून रक्कमेची उचल केल्याचे व्हाऊचर क्र.६ दि.३०/४/२०१८ ची नोंद असलेला हजेरी पटाची झेरॉक्स प्रत आढळली.तर काही हजेरी पटावर रक्कम उचल करणाऱ्यांच्या सह्या-अंगठेच नाही.यामुळे दिवाकर मंडपे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी; या करिता संवर्ग विकास अधिकारी ब्रह्मपुरी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली.या तक्रारीवरून चौकशी अधिकारी जयेंद्र राऊत यांनी चौकशी करून जिल्हा उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल पाठविला.या चौकशी अहवालात तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश्वर तुपट व तत्कालीन ग्राम सेवक दिनेश येरणे दोषी आढळले.यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून दिवाकर मंडपे यांनी पाठपुरावा केला.याची दखल घेऊन संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी यांनी दि.१४ सप्टेंबर २०२२ ला तक्रार दिली.यावरून अप नं.४६१/२०२२ गुन्हा दाखल करण्यात आला असून नोंद करून पोलिसांनी दि.१४ मार्च रोजी ग्रामसेवक तर दि.१५ मार्च रोजी सकाळी सरपंचाला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेंद्र उपरे हे.कॉ.अरुण पिसे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!