Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियापरतीच्या प्रवासात अपघात; वडील ठार,कुटूंबीय गंभीर जखमी..

परतीच्या प्रवासात अपघात; वडील ठार,कुटूंबीय गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-मुलाच्या विवाह सोहळ्याची तयारी व खरेदीकरिता रायपूरला गेलेल्या दाम्पत्याचा परतीच्या प्रवासात अपघात होऊन वडील ठार झाले,तर ठार होणाऱ्यांची पत्नी,मुलगा,मुलगी व साळी गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास देवरी-आमगाव मार्गावरील डोंगरगाव सोनारटोला जवळ घडली.अशोक सत्यनारायण मोदी वय ५५ वर्षे,रा.आमगाव,जि.गोंदिया असे अपघातात ठार झालेल्या वडिलाचे नाव आहे.तर जखमींमध्ये अशोक यांची पत्नी सीमा अशोक मोदी वय ५० वर्षे,मुलगा आयुष अशोक मोदी वय २९ वर्षे,२५ वर्षीय मुलगी मुस्कान अशोक मोदी व साळी दीपा नितीन अग्रवाल असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून जखमींवर गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अशोक मोदी हे कारने कुटुंबीयांसह मोठ्या मुलाच्या विवाह सोहळ्याची तयारी व खरेदीकरिता रायपूरला गेले होते.कारने गुरुवारच्या रात्रीच्या सुमारास रायपूरवरून आमगावला कुटुंबासह परत येत असतांनाच अशोक मोदी यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार आमगाव-देवरी मार्गावरील डोंगरगाव जवळील सोनारटोलाच्या पुलावरील खांबावर जाऊन जोरदार धडकली.यात अशोक मोदी,त्यांची पत्नी सीमा मोदी, मुलगा आयुष मोदी,मुलगी मुस्कान मोदी व साळी दीपा अग्रवाल हे गंभीर जखमी झाले.जखमींना उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना वाटेतच अशोक मोदी यांचा मृत्यु झाला.तर इतर जखमींवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.ऐन विवाह सोहळ्याच्या जवळच दुःखद घटना घडल्याने मोदी कुटूंबीय शोकसागरात बुडाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!