Tuesday, August 25, 2026
Homeदेसाईगंजरेती भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळ काढणाऱ्या तस्कराच्या देसाईगंज पोलिसांनी आवळल्या मुसक्या- रेतीची...

रेती भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळ काढणाऱ्या तस्कराच्या देसाईगंज पोलिसांनी आवळल्या मुसक्या- रेतीची विसोरा येथे केली जात होती वाहतूक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- सध्याच्या घडीला तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काही प्रमाणातील रेती घाट सोडले तर उर्वरित बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.रेती तस्करी करून चढ्या दराने खुलेआम विक्री करतांना रेती चोरटे सर्वत्र दिसून येत आहेत. अशातच काल १५ मार्च २०२३ रोजी रात्रोच्या सुमारास देसाईगंज पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी वर्ग गस्तीवर असतांना अवैधरीत्या रेतीचे ट्रॅक्टर विसोरा येथे वाहतूक करतांना पोलिसांच्या निदर्शनास आले असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच विना नंबर ट्रॉली ट्रॅक्टरचा पाठलाग केला.मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगाने ट्रॅक्टर पळवून लावित गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.

चोर कितीही गुंगारा देण्याचा प्रयत्न करेल; मात्र पोलीस प्रशासनाच्या तावडीतून सुटणे अशक्य असल्याची खरी प्रचिती भरधाव वेगाने नेणाऱ्या रेती तस्कारास कळले असेलच; अखेर गस्तीवर असणाऱ्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी गुंगारा देणाऱ्या रेती तस्काराचा रात्रोच्या सुमारासच शोध घेऊन रेती भरलेला ट्रॅक्टर देसाईगंज पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.सदर रेती भरलेला ट्रॅक्टर शंकरपुर येथील विनोद बुद्धे यांच्या मालकीचा आहे.जमा करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत देसाईगंज तहसील कार्यालयास पत्रव्यवहार करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचे देसाईगंज पोलीस प्रशासनाने कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!