Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीउद्याला राज्याचे मुख्य सचिव गडचिरोलीत..

उद्याला राज्याचे मुख्य सचिव गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे उद्या,मंगळवार २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून
या दौऱ्यात ते जिल्ह्यातील खनिज प्रकल्प,औद्योगिक विकास तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत.त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता मुख्य सचिव  अग्रवाल यांचे सुरजागड येथे आगमन होणार असून तेथील खनिज परिसर,कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR)उपक्रम तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करतील.त्यानंतर दुपारी १२.३० वाजता कोनसरीकडे प्रयाण करून १२.४५ वाजता कोनसरी स्टील प्रकल्पाची पाहणी करतील.दुपारी २.४० वाजता ते मार्कंडा देवस्थान येथे भेट देणार असून,तेथील भारतीय पुरातत्व विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)यांच्या अधिकाऱ्यांसोबत मंदिर जीर्णोद्धार व घाट विकासाबाबत चर्चा करतील.सायंकाळी ५ वाजता गडचिरोली येथील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन,इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)येथे पाहणी. त्यानंतर सायंकाळी ५.४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत ग्रामीण विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.त्यानंतर रात्री गडचिरोली येथे मुक्काम.
बुधवार,२१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासन व खनिकर्म विभागाच्या कामांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!