Monday, August 31, 2026
Homeगोंदियामाहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकाला २५ हजाराचा दंड..

माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकाला २५ हजाराचा दंड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेली माहिती हलक्यात घेणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास चांगलीच महागात पडली आहे.माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तत्कालीन ओ.एन.तुरकर  ग्रामसेवकाला राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने तब्बल २५ हजाराचा दंड ठोठावला असून सदरचा दंड शासकीय कोषागारात जमा करण्याचे निर्देश राज्य माहिती आयुक्तांनी गोंदिया पंचायत समितीच्या बीडीओंना दिले आहेत.राज्य माहिती आयुक्तांच्या निर्णयाने माहिती दडवणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
अधिक माहिती अशी की,गोंदिया तालुक्याच्या
एकोडी गावातील ग्रामस्थ नामदेव बिसेन यांनी एकोडी ग्रामपंचायतीअंतर्गत केलेल्या काही कामांची माहिती माहिती अधिकार अर्जाद्वारे ४ फेब्रुवारी २०२२ रोजी माहिती मागितली होती.त्यावेळेस,जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक तुरकर यांनी माहिती देण्याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे बिसेन यांनी प्रथम अपीलीय अधिकारी तथा बीडीओ यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले.अपील दाखल केल्यानंतर आदेश काढण्यात आला.मात्र,सदर आदेशानुसार माहिती देण्याचे ग्रामसेवक यांच्याकडून टाळण्यात आल्याने बिसेन यांनी २० एप्रिल २०२२ रोजी राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केले होते.त्यानुसार,यावर ९ डिसेंबर २०२५ रोजी खंडपीठात सुनावणी पार पडून आदेश काढण्यात आला.आदेशात तत्कालीन जन माहिती अधिकारी तुरकर यांना दोषी ठरवत २५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.महत्वाचे म्हणजे,माहिती अधिकार कायद्यातील पायऱ्या संथगतीने चालत असल्या तरीही काही प्रकरणात आता न्याय मिळू लागल्याने काहींनी समाधान व्यक्त केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!