Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेचे हॉल तिकीट..

आता दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेचे हॉल तिकीट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार १२ जानेवारीपासून परीक्षेचे हॉल तिकीट(प्रवेशपत्र)उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अश्यातच आता येत्या,२० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावीच्या) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे ऑनलाईन माध्यमातून उद्या,मंगळवार २० जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यातच,दहावीची प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे. त्यानुसार,इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे संबंधित माध्यमिक शाळांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत. हॉल तिकीट देतांना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये.छापील प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित शाळांनी आपल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा,असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे; अशा विद्यार्थ्यांनाच हॉल तिकीट उलपब्ध होणार आहे.तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप शुल्क भरलेले नाही; अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरल्यानंतर हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांनी ही प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.inwww.mahahsscboard.in वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करावीत,असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!