Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता किरकोळ शस्त्रक्रिया व प्राथमिक उपचार गावातच मिळणार मोफत..

आता किरकोळ शस्त्रक्रिया व प्राथमिक उपचार गावातच मिळणार मोफत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता देण्यात आल्याने किरकोळ शस्त्रक्रिया व प्राथमिक उपचार गावातच मोफत मिळणार आहे.त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवेला मोठे बळ मिळणार आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी आतापर्यंत रुग्णांना खासगी अथवा जिल्हा रुग्णालयांमध्ये जावे लागत होते.मात्र,आता राज्य सरकारने या योजनेत गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा(PHC)समावेश केल्याने ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.किरकोळ शस्त्रक्रिया,जखमांवर टाके देणे,प्राथमिक उपचार यांसारख्या सेवा आता गावातच मोफत उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे वेळ,पैसा आणि शहरात  जाण्याचा त्रास वाचणार आहे. राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या योजनेशी जोडण्यासाठी सध्या नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे.जे केंद्र आवश्यक निकष पूर्ण करतील,त्यांना तात्काळ या योजनेची मान्यता देऊन तिथे उपचार सुरू केले जाणार आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार या योजनेतून मिळत राहतील.ग्रामीण भागातील रुग्णांना लहानसहान उपचारांसाठी जिल्हा किंवा खासगी रुग्णालयात जावे लागत होते.आता हेच उपचार गावातील आरोग्य केंद्रात मिळणार असल्याने रुग्ण व नातेवाइकांचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतून जखमांवर टाके देणे, भाजल्यावरील उपचार,अपघाती जखमा,संसर्ग,ताप, वेदनांवरील प्राथमिक उपचारांसह सुमारे ३५ प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत.महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या केंद्रांचा टप्प्याटप्प्याने यात समावेश केला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!