उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागात आज,शनिवार ३ जानेवारी रोजी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत बिजापूर जिल्ह्यात दोन तर सुकमा जिल्ह्यात १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलास यश आले आहे.त्याचबरोबर, सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणांवरून एके-४७, इन्सास आणि एसएलआर रायफल्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत.बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागात सशस्त्र नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक(DRG)सह अनेक सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांना शोध मोहिमेवर पाठवण्यात आले.या कारवाईदरम्यान,विविध ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी झाल्या.शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून १४ माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.महत्वाचे म्हणजे,बस्तर रेंज हा नक्षलवादी कारवायांसाठी संवेदनशील क्षेत्र मानला जातो.विजापूर आणि सुकमा जिल्हे हे विशेषतः नक्षलवादी संघटनांचे सक्रिय गड मानले जातात.जिथे ते सुरक्षा दलांवर हल्ले करून रस्त्याच्या बांधकामात अडथळा आणून आणि ग्रामस्थांना धमकावून दहशत पसरवतात.त्यामुळे,राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सुरक्षा दल या भागात सतत नक्षलविरोधी कारवाया करत आहेत.
सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

