Saturday, June 27, 2026
Homeनागपूरअमानवीय कृत्य..! पोटच्या गोळ्याला बांधून ठेवायचे साखळी व कुलूपाने..

अमानवीय कृत्य..! पोटच्या गोळ्याला बांधून ठेवायचे साखळी व कुलूपाने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मुलगा चुकीचे वागतो म्हणून चक्क आई-वडिलांनी आपल्या अवघ्या १२ वर्षाच्या मुलाचे हात आणि पायांना साखळी व कुलूप लावून बांधून ठेवल्याची धक्कादायक तितकीच हादरवून टाकणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे.गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आई-वडील आपल्या पोटच्या गोळ्याला बांधून ठेवत असल्याने त्याच्या हाता-पायाला जखमा झाल्या आहेत.मुलाचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात.घरात मोठे कुणीच नसल्याने दिवसभर मुलगा चुकीचे वागायला लागला होता.त्यामुळे आई-वडील कामासाठी घरातून जातांना त्याला साखळी व कुलपाने बांधून ठेवायचे आणि कामावरून आल्यानंतर त्याला मोकळे करायचे.या मुलाच्या संदर्भातील माहिती चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.तेथे भयभीत अवस्थेत, वेदनेने थरथर कापणारा मुलगा आढळून आला. मुलाच्या हाता-पायांवर जखमांचे व्रण,चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती.लागलीच बाल संरक्षण पथकाने चिमुकल्याची सुटका केली.मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित बालगृहात दाखल करण्यात आले असून,मानसिक आघात दूर करण्यासाठी समुपदेशनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुलाला बाल कल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे.ज्या आई-वडिलांच्या कुशीत मुलाला सुरक्षिततेची भावना मिळायला हवी,त्याच कुशीतून क्रौर्याचे दर्शन घडल्याने सर्वजण अवाक् झालेत.याप्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून,पोलिस बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत पोलिस पुढील तपास करीत आहेत.सदरची कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण,संरक्षण अधिकारी साधना हटवार, कायदा व परीविक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने व चाइल्ड लाइन प्रतिनिधी मंगला टेंभुर्णे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!