Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआमदार सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची पक्षाकडून दखल..

आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची पक्षाकडून दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने चांगले यश मिळवले.पण,चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही.या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाला खडेबोल सुनावले होते.आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली”, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षावर आगपाखड केली होती.त्यानंतर, सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीची पक्षाकडून दखल घेण्यात आली.मुंबईमध्ये मुनगंटीवार यांची पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक झाली.त्यानंतर भाजपकडून चंद्रपूर महापालिका निवडणूकप्रमुख पदावरून जोरगेवार यांना हटवण्यात आले.त्यांच्याऐवजी आता माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.महापालिका निवडणूक सुरू असतांनाच हा निर्णय घेण्यात आल्याने भाजपने मुनगंटीवारांचे ऐकत त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा रंगली आहे.भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात आधीपासूनच संघर्ष आहे.अपक्ष आमदार असतांना किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून विरोध केला होता.आम्ही फक्त संतरज्या उचलायच्या कां? अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याचे मुनगंटीवार म्हणाले होते.पण,पक्षाने त्यांचा विरोध डावलून जोरगेवार यांना पक्षात प्रवेश दिला.२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षात घेण्यात आले होते. त्यानंतर मुनगंटीवार-जोरगेवार यांच्यातील संघर्ष सुरूच आहे.नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुनगंटीवार यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. ‘जसे शनिशिंगणापूरला दरवाजे नाहीत,तसे आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत.कोणीही येतो,कोणीही जातो’, असे म्हणत मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!