- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-मैत्रिणीकडे नोटबुक परत करण्यासाठी पायी निघालेल्या अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणास चांगलेच महागात पडले आहे.प्रकरणी मुलींनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आणि तब्बल एक वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीनंतर आरोपी तरुणास जिल्हा विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.एन.गौतम यांनी काल मंगळवारी चार वर्षाचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे.महेश भोलाराम मुर्ख वय ३५ वर्षे,रा.सुभाष वॉर्ड,तिरोडा, जि.गोंदिया असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी नाव आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील तीन अल्पवयीन मुली ८ जुलै २०२४ रोजी मैत्रिणीच्या घरी गणिताची नोटबुक परत करण्यासाठी नाग मंदिरापासून सपना फॅशन दुकानाजवळ पायी जात असतांना दुकानासमोर आरोपी महेश मुर्ख याने पीडित अल्पवयीन मुलीकडे पाहून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिघींच्या मधून चालत जाऊन छेड काढली.यामुळे मुली घाबरल्या आणि पोलिसांत तक्रार नोंदवली.त्यानुसार, तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(१), ७८,सहकलम ८,१२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी केला होता.या प्रकरणावर काल मंगळवारी न्यायालयात सुनावणी पार पडली.विशेष सत्र न्यायालयासमोर विशेष सरकारी वकील पारधी यांनी आरोपी विरोधात सात साक्षीदार तपासले.तर पीडितेची बाजू विशेष सरकारी वकील कृष्णा तिवारी यांनी मांडून आरोपीने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचे कश्या प्रकारे उल्लंघन केल्याचा पाढा वाचला.प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.एन.गौतम यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ८ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला, तसेच दंड न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला.दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास सुनावला.
- Advertisement -

