Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीघरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल्स,ढाबे आणि व्यावसायिक आस्थापनांत वापर.. - वेगवेगळ्या ठिकाणी छापे;...

घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल्स,ढाबे आणि व्यावसायिक आस्थापनांत वापर.. – वेगवेगळ्या ठिकाणी छापे; शेकडो सिलेंडर जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-घरगुती गॅस सिलेंडर हे घरगुती वापरासाठी असून त्याचा हॉटेल्स,ढाबे वा इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापर करता येत नसतांनाही अनेकजण व्यावसायिक वापरसाठी त्याचा उपयोग करतांना दिसून येतात.त्यामुळे घरगुती वापरासाठी सबसिडीवर उपलब्ध असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या नेतृत्वात १३ ते आज,सोमवार १५ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच खरेदी अधिकारी यांच्या अंतर्गत तालुक्यातील १२ निरीक्षण अधिकारी, १७ पुरवठा निरीक्षक,९ गोदाम व्यवस्थापक, २९ लिपिक व ८ शिपाई अशा एकूण ७८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.या कारवाईदरम्यान विविध हॉटेल्स,ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर तपासणी करण्यात आली.या कारवाईत घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करतांना आढळलेल्या व्यावसायिकांकडून एकूण १०० पेक्षा अधिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.ही सिलेंडर सबसिडीचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक हेतूने वापरली जात होती,ज्यामुळे सरकारच्या सबसिडी योजनेचा दुरुपयोग होत होता आणि सामान्य नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा प्रभावित होत होता.व्यावसायिकांनी निळ्या रंगाचे कमर्शियल एलपीजी सिलेंडर वापरावेत. घरगुती(लाल रंग) सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा कायद्याने गुन्हा आहे.जप्त करण्यात आलेली सिलेंडर संबंधित गॅस वितरकांना सुपूर्द करण्यात येत असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.जिल्ह्यातील नागरिकांना व व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की,घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर किंवा काळाबाजार करू नये.व्यावसायिकांनी निळे कमर्शियल सिलेंडर वापरावेत.अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
  • जिल्हा पुरवठा अधिकारी,सुधाकर पवार👇
“घरगुती गॅस सिलेंडर फक्त घरगुती वापरासाठीच आहेत.व्यावसायिकांनी निळ्या रंगाचे कमर्शियल सिलेंडर वापरावेत.घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर हा कायद्याने गुन्हा आहे.अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात सतत छापे आणि तपासणी मोहीम सुरू राहील.दोषी आढळलेल्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!